केकतनिंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर पाडण्यास पुरातत्व विभागाकडून स्थगिती

जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरे हे गाव जळगाव रोड वर वसलेले आहे . रोड च्या डाव्या बाजूला अंदाजे 400 ते 450 शे वर्षापूर्वी स्थापित झालेले पुरातन मंदिरे स्थापित आहे ज्यात विठ्ठल रखुमाई मंदिर व लक्ष्मी नारायण मंदिर असे दोन मंदिरे रोड लगत असल्याने गावाची ओळख बनलेले आहे. पंचक्रोशीत पुरातन मंदिरे असल्याने यांची ख्याती तालुकाभर प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसापासून वावडदा नेरी जामनेर रोड रुंदीकरण व काँग्रेटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रोड वरील सर्व जुने वटवृक्ष ही काढण्यात आले आहे. मात्र केकत निंभोरे येथील पुरातन विठ्ठल रखुमाई मंदिर हे रस्त्यावर आल्याने प्रशासनाची तारबळ उडाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने केकत निंभोरे गावाची मंदिरे पाडणे बाबत विशेष ग्रामसभा बोलण्याचा निर्णय घेतला असता गावकरी म्हणून तथा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी पुरातन मंदिरे पाडण्यास तीव्र विरोध दर्शविला होता तशी नोंद प्रोसेडिंग व ठरावात घ्यायची सांगितले व पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याचे ही नमूद केले. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग हे मंदिरे काढनेवर ठाम असल्याचे पाहून ग्रामसभेत मनसे अध्यक्ष अशोक पाटील , अमोल माळी , नाना पाटील यांचा विरोध असताना देखील ग्रामपंचायत ने सर्वानुमते मंदिर पाडणेस संमती असल्याचा ठराव संमत केला होता. त्या अनुषंगाने मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी मे. कोर्टाकडे दावा दाखल करणे बाबत हालचाली सुरू केल्या होत्या व पुरातत्व विभाग मुंबई , पुणे , नाशिक यांच्याशी पत्र व्यवहार केले , चर्चा केली , ठराव नक्कल व संबंधित मंदिरांचे 7/12 उतारे व नोंदी व मनसे ने जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेले निवेदन व पाठपुराव्याचे पत्र देखील सुपूर्त केले असता. संबंधित पुरातत्व विभाग खळखळून जागे झाले. आणि क्षणाचा विलंब न करता जामनेर तालुका तहसील कार्यालयात मां तहसीलदार साहेब व ग्राम पंचायत केकत निंभोरे यांना मंदिरे संवर्धनाबाबत तात्काळ निर्देश देण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये मंदिरे काढण्यासाठी स्थगिती मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

पुरातत्व विभागाने पुरातन मंदिरे यांना इजा होणार नाही , हानी होणार नाही , याची काळजी घेण्याचे निर्देश देत संबंधित मंदिरांचे संवर्धन करणे बाबत आदेश दिले आहेत. त्यात विशेष 1982 चे परिपत्रकाचे संदर्भ देत मंदिरं काढू नये व त्यास धक्का लागू नये याची काळजी घेण्याचे आदेश देऊन आपला महामार्ग करणेस पर्यायी मार्ग तथा पर्यायी व्यवस्था करण्याचे देखील सुचविले आहे.

मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी पुरातत्व विभागाचे आभार मानत निर्णयाचे स्वागत केले आहे. व रस्त्याला आमचा कुठलाही विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागील 3 वर्षापासून केकत निंभोरा येथील जुने वटवृक्ष काढणेस विरोध दर्शविला होता मात्र आमची विकासात कोणतीही अडचण तथा तक्रार नाही या अनुषंगाने रस्ता रुंदीकरणात अडचण होणाऱ्या झाडांना काढणे साठी देखील संमती दर्शवली आहे. तसे ते झाडे काढण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यास कुठलाही विरोध नसल्याचे यावरून स्पष्ट दिसते मात्र पुरातन मंदिरे याबद्दल श्रद्धा असल्याने ते काढणे साठी तीव्र विरोध केल्याचे ही सांगितले. आणि पुरातन विभागाने स्थगिती दिल्याचे ही नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!