हिंगणे बु (ता. जामनेर) -: येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत हिंगणे बु व शिवप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिरात सुमारे 34रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. या उदात्त कार्यात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आयोजकांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत सदस्य, शिवप्रेमी मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. समाजात रक्तदानाबाबत जनजागृती होऊन गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत असून भविष्यातही अशा जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.












Leave a Reply