हिवरखेडा बुद्रुक येथील अवैध दारू विक्री बाबत नुकतीच गावातील महिलांनी व तरुणांनी अवैध दारू विक्री विरोधात तोडफोड केली होती , काही दिवसापूर्वी गावात या अवैध दारू विक्री मुळे एका लहान मुलीवर अतिप्रसंग झाला होता. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. गावाने एकमताने निर्णय घेऊन गावातील दारू हद्दपार करूया या उद्देशाने अवैध दारू विक्री विरोधात तोडफोड केली होती. त्या अनुषंगाने आज रोजी ग्रामसभा बोलवण्यात आली होती. या ग्रामसभेत दारू बंदी ठराव मंजूर करण्यात आला, हिवरखेडा बुद्रुक गावात अवैध धंदे बऱ्याच दिवसात पासून जोरात सुरू होते त्या संदर्भात गेल्या चार दिवसापूर्वी महिला व तरुणांनी दारुड्या चे मालाची नास दुश करून कायमस्वरूपी बंद करून द्यावी या संदर्भात दारूवाल्यांना सुद्धा सांगण्यात आले तसेच गावातून ग्रामसभा घेण्यात यावी ग्रामसभेत ठराव करण्यात यावा या संदर्भात दिनांक 2/6/2026 रोजी संध्याकाळी पाच वाजता ग्रामसभा घेण्यात आली त्यावेळी महिला सह तरुण ग्रामसभेसाठी मोठा संख्येने उपस्थित होते यावेळी  प्रशासक देवदास जोहरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ग्रामसेवक श्रीकृष्ण पाटील, पोलीस पाटील लीलाधर मालखेडे, प्रभाकर गायकवाड. तुषार पाटील,उपस्थित होते यांनी मागील  प्रोसिडीग वाचून सभेला सुरुवात करण्यात आली अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी  महिलांनी व तरूनांनी आपल्या गावातील अवैध्य धंदे बंद करण्यात यावे, तसेच तंटामुक्त समिती स्थापन करण्यात आली व दारूबंदी कमिटी स्थापन करण्यात आली. तंटामुक्ती अध्यक्ष सुदर्शन काशीनाथ महाजन उपाध्यक्ष उज़्वल बाबूराव पाटील यांची निवड करण्यात आली व दारूबंदी समिती अध्यक्ष अरुणाबाई अनिल जाधव तसेच गावातील प्लाट भागातील पाणीपुरवठा योग्य रीतीने करण्यात यावा व्यायामशाळा मोठी बिल्डिंग बांधून ठेवलेले आहे ते सुद्धा मोकळी करून द्यावी गावात बऱ्याच दिवसापासून गटारी साफसफाई व फवारणी झालेले नसल्याने यामुळे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला ग्रामसेवक श्रीकृष्ण पाटील यांनी गावातील पाणीपुरवठा गटारी साफसफाई फवारणी या आरोग्य विभागाकडे लक्ष द्यावे अशी मोठ्या आवाजात एक मुखी मागणी केली नवीन गावातील गावातील सर्व गटारी तू मन भरलेले आहेत या कधी काढणार आता पावसाळ्याचे दिवस आहेत या गटारी मध्ये पाणी तुबल्यानंतर काही लोकांच्या घरामध्ये पाणी जाईल आरोग्य खराब होईल असे जबाबदार कोण असे ग्रामसेवकाला प्रश्न विचारण्यात आला या सर्व विषयाची गंभीर दखल घेऊन लोकांच्या आरोग्याशी दारू व गांजामुळे कोणाचा संसार उद्ध्वस्त होईल असे वागू नका असे ग्रामस्थांनी ग्रामसेवक श्रीकृष्ण पाटील,व प्रशासक यांना सांगण्यात आले याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी असे ग्रामसभेत ग्रामस्थांनी सांगितले ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!