जामनेर-: गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप करण्यात येत असते. मात्र या सरकारी धान्याचा काळाबाजार केला जात असल्याचे समोर आले आहे. अशा पद्धतीने काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जात असताना २०० पेक्षा जास्त पोती तांदूळ घेऊन जाणारा ट्रक जामने तहसीलच्या पुरवठा विभागाने आणि आणि पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.सुमारे 255 क्विंटल तांदूळ या ट्रकमध्ये होता, हा सर्व तांदूळ सरकारी रेशनिंगचा असल्याचा संशय काही पत्रकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.एका वाहनात हा तांदूळ नेला जात असताना फत्तेपूर हून पहुरच्या दिशेने जात असतांना या ट्रकला जामनेर येथे ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी नारायण सुर्वे यांच्याकडून पंचनामा करण्यात आला. या वाहनामध्ये 255 क्विंटल पेक्षा जास्त तांदूळ असल्याचे निष्पन्न झाले. सदरील तांदूळ हा सरकारी रेशनिंगचा आहे की इतर कोणता? , त्याचबरोबर हा तांदूळ नेमका कुठून खरेदी केला होता आणि कुठे जात होता याबद्दलचा तपास सुरू आहे. पुढे तपासांती काय समोर येतं हे बघ ना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.रेशन कार्ड धारकांना दार महिन्याला मोफत धान्य वाटप करण्यात येत असते. यात प्रामुख्याने तांदूळ, गहू तर कधी ज्वारी देखील वाटप करण्यात येत असते. यासाठी अन्न पूरवठा विभागाकडून प्रत्येक रेशन धान्य दुकानात याचा पुरवठा करण्यात येत असतो. मात्र बऱ्याचदा लाभार्थ्यांना पूर्ण धान्य दिले जात नाही. तर काही लाभार्थी आले नाही त्यांच्या हिस्स्याचे धान्य विक्री केले जात असते. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु असतो.
जामनेरमध्ये २५५ क्विंटल तांदळाचा ट्रक ताब्यात; सरकारी धान्याचा काळाबाजार असल्याचा संशय











Leave a Reply