जामनेर तालुक्यातील पानमळ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

जळगाव,  – : जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे नष्ट होत असलेल्या विड्याच्या पानमळ्यांची प्रत्यक्ष भेट देऊन नुकतीच पाहणी केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शिवलाल बारी यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

देवीदास लक्ष्मण पुसे यांच्या पानमळ्यात झालेल्या पाहणीदरम्यान माजी उपसभापती सुधाकर भाऊ बारी, ज्येष्ठ नेते अमृत खलसे, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना रोगग्रस्त पानवेलींची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी घुगे यांनी स्वतः विड्याचे पान तोडण्याचे प्रात्यक्षिक करून पाहिले तसेच मुळकुजव्या रोगामुळे बाधित झालेल्या वेलांची पाहणी केली.

शिवलाल बारी यांनी राज्यभरात पानमळ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बारी समाजातील पान उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचे सांगितले. तसेच पानमळ्यांसाठी धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित असल्याबद्दल खंत व्यक्त केली.

 

या प्रसंगी सुधाकर बारी, अमृत खलसे, तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील यांच्यासह अनेक पान उत्पादक शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांची ही भेट ऐतिहासिक ठरत असून पानमळा उद्योगाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!