दिव्यांग विद्यार्थी व पाल्य यांना शालेय साहित्य वाटप

लोहारा (पाचोरा)-: जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी लोहाराच्या वतीने व एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण दिव्यांग विद्यार्थी व पाल्य यांचा शालेय साहित्य वाटप आणि गुणगौरव कार्यक्रम लोहारा येथे संपन्न झाला.

जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसा निमित्त दि.17/05/2026 रविवार रोजी सकाळी 9:00 वाजता माळी समाज मंगल कार्यालय येथे भारतीय जनता पार्टी लोहाराच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य व भाजपा कार्यकर्ते कैलास चौधरी यांच्या तर्फे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना व पाल्यांना रजिस्टर-वह्यांचा सेट, पेन, पेन्सिल इत्यादी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

तसेच सालाबादप्रमाणे एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण दिव्यांग विद्यार्थी व पाल्य यांचा शालेय साहित्य वाटप आणि गुणगौरव कार्यक्रम दिव्यांग संस्थेच्या वतीने संपन्न करण्यात आला. तर डॉ.जे जी पंडित माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी एम सुर्वे सर यांच्याकडून शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना व पाल्यांना परीक्षा पॅड वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांतर्फे दत्तात्रय भुसांडे गुरुजी, प्रभाकर काळू चौधरी गुरुजी, व कैलास चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य व भाजप कार्यकर्ते कैलास चौधरी, उपसरपंच दीपक खरे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विकास देशमुख, डॉ.सुभाष घोंगडे, अनिल तडवी, अतुल कोळी, भास्कर भोई, विशाल खाटीक, हसन शेठ, सादिक मन्नान खान, दिलीप चौधरी, सुरेश चौधरी, विवेक जाधव, सुभाष बाविस्कर, जयेंद्र पाटील, प्रवीण चौधरी, शरद कोळी, श्याम शिंपी, सुनील देशमुख, श्याम पालीवाल, सुनील खरे, विलास काळे सर, मनोज भोसंडे, सुभाष चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव विजय जाधव, खजिनदार कांतीलाल राजपूत, सदस्य विकास शिवदे, बाळू जाधव, अनिल चौधरी, अनिल राजपूत, अहमदखान पठाण व इतर दिव्यांग सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!