नेरी-जामनेर रस्त्यावर रात्रभर वाळू डंपरांची सुसाट धाव; महसूल प्रशासनावर प्रश्नचिन्ह

जामनेर तालुक्यातील नेरी ते जामनेर मार्गावर रात्री ९ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत वाळूने भरलेली डंपर मोठ्या वेगाने धावत असल्याचे चित्र समोर येत आहे. या मार्गावर दररोज शेकडो डंपरची वाहतूक होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आज रात्री ११ वाजता महाराष्ट्र ढाबा येथे पोलिस प्रशासनाने पेट्रोलिंग करीत असताना एका डंपरवर कारवाई करण्यात आली, तरी इतर डंपर मात्र कोणत्याही भीतीशिवाय सुसाट धावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.इतर डंपर व कारवाई का होत नाही तसेच स्थानिकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, “हप्ता मिळाला नाही की कारवाई केली जाते,” त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तहसीलदार कार्यालयाचे पथक केवळ नामधारी असून प्रत्यक्षात अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

विशेष म्हणजे अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडून स्वतंत्र कारवाई होताना दिसते; मात्र महसूल विभाग आणि तहसील प्रशासन संयुक्त कारवाई करताना दिसत नसल्याने नागरिकानी संताप व्यक्त करत आहे. “जर पोलीस कारवाई करू शकतात, तर महसूल प्रशासन झोपेत आहे का?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रात्रीच्या वेळी भरधाव धावणाऱ्या डंपरमुळे अपघाताचा धोका वाढला असून,  या मार्गावरील गावातील नागरिकांनी तातडीने संयुक्त मोहीम राबवून अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.परंतु या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन काय कारवाई करते याकडे आता लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!