अमळनेरमध्ये एटीएममध्ये पैसे नसल्यानेतकऱ्यांची गैरसोय

अमळनेर(अमोल पाटील) : शहरातील विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः दुपारच्या कडक उन्हात अनेक शेतकरी एटीएमसमोर रांगेत उभे राहत असून, पैसे नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असल्याने बियाणे, खत, औषधे तसेच इतर गरजांसाठी रोख पैशांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे. मात्र एटीएममध्ये वारंवार “No Cash” ची स्थिती निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

अनेक नागरिकांनी सांगितले की, एका एटीएममध्ये पैसे नसल्याने दुसऱ्या एटीएमकडे धाव घ्यावी लागत आहे. उन्हाचा तडाखा वाढत असताना ज्येष्ठ नागरिक व शेतकरी यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रशासन आणि संबंधित बँकांनी एटीएममध्ये नियमितपणे रोख रक्कम उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!