जामनेर : (मुख्य संपादक सागर लव्हाळे)जामनेर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निवृत्ती बोऱ्हाडे यांची नियुक्ती झाल्याने आता जामनेर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी व नागरिकांमध्ये चर्चा होत असून, या पार्श्वभूमीवर नवनियुक्त पोलीस निरीक्षकांसमोर अवैध धंद्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
विशेषतः अवैध दारू विक्री, जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर प्रभावी कारवाई करण्याची नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केवळ अधूनमधून कारवाई न करता अवैध धंद्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यावर कायमस्वरूपी अंकुश ठेवण्याची गरज आहे.
जामनेर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही पोलिसांची गस्त वाढवणे, अवैध धंद्यांबाबत मिळणाऱ्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेणे आणि कारवाईत सातत्य ठेवणे, ही नवनियुक्त पोलीस निरीक्षकांसमोरील महत्त्वाची जबाबदारी ठरणार आहे.
निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पोलिसांची कार्यक्षमता आता प्रत्यक्ष कारवाईतून दिसणार का? तालुक्यातील अवैध धंद्यांवर खऱ्या अर्थाने लगाम बसणार का? याकडे जामनेरकरांचे लक्ष लागले आहे.
यानागरिकांच्या अपेक्षा आणि पोलिसांसमोरील आव्हान यांची सांगड घालत नवनियुक्त पोलीस निरीक्षक आगामी काळात कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
