जामनेर :- शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून नगरपरीषद मार्फत शहरात CCTV कामेरे बसवण्यात आले होते. परतू हे चालूच करण्यात आलेले नसल्याने त्याना पाच ते आठ वर्ष झाले असून त्यांची अवस्था दुर अवस्था आज अत्यत वाईट आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या दरोडे सह गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. घरात मंदिरात दुकानात चोऱ्या होत आहे. रसत्यावर महीलाचे अगावरील दागिने चोर ओढून नेत आहे. रस्त्यावर बाईक / मोबाईल/ पाकीट च्या मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडत आहे. अपघात वाढले आहे. चारचाकी कार तसेच वाडु डंपर खाली लोक चिरडले जाताय परंतु आरोपी व गुन्हेगार सापडत नसून शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनता त्रस्त आहे. कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शहरात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळोवेळी सुरक्षेच्या नावाखाली शहरातील भाजीपाला / फळ विक्री आणि कुटुबाचा उदारानिर्वाह करणाऱ्या हाथ गाड्या टपऱ्या हे अतिक्रमण नगर परिषदेला दिसत . मग महत्वाची आवश्यक सुरक्षेचे बंद पडलेले दुरावस्थेतील cctv सिसिटीव्ही नगरपरीषदेला दिसत नाही का..? का जामनेर कराच्या जिवाशी खेळताय असा प्रश्न जामनेरचे सामाजिक कार्याकर्ता अविनाश बोरसे नी उपस्थित केला आहे. बोरसेचे म्हणे आहे की शहरात विना नंबर प्लेट चोरीचे वाळु डंपर चोरून वाळु वाहतुक करत आहे. हे रसत्यावर लोकाना चिरडताय हे डंपर वाले नगर परीषदेतील आधिकारी नगरसेवकाचे नातलग कार्यकर्ते आहेत. त्याना वाचवण्यासाठी त्याच्या सुरक्षेसाठी शहरात CCTV लावले जात नसल्याचे बोरसेनी सांगितले. जामनेर नगरपरीषदेला जनतेच्या सुरक्षेची काळजी नसून शहरात लावलेले CCTV शोपीस असल्याचे बोरसेनी सांगितले. तसेच कायदा सुवव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक यांनी नगरपालिकेला CCTV साठी पत्र द्यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच मोठया अदोलनाचा ईशारा देण्यात आला.
