जामनेर तालुक्यातील फत्तेपुर पलीस ठाणे अंतर्गत का ३० वर्षीय विवाहित महिलेवर गुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी फत्तेपूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला आरोपींनी जेवणातून गुंगीचे औषध दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला संशयित आरोपीने आपल्या शेतातील पत्राच्या शेडमध्ये घेऊन जात आरोपींनी तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओही तयार करण्यात आल्याचा आरोप असून, तो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेला वारंवार धमकावल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणात रामेश्वर गणपत राठोड, अर्जुन भीमराव राठोड, पवन छगन राठोड, भारत कुपाल सावळे यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील सामूहिक बलात्कार, अपहरण, दुखापत, धमकी, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी, पाचोरा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलिस करत आहेत.
