जामनेर : येथील जीनियस इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सवानिमित्त शाळेत श्री गणेशाची आरती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांचे आकर्षक सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. ११ दिवसाच्या गणेशोत्सवात रोज पालकांना आरतीचा मान दिला जातो. रोजच्याप्रमाणेच आजच्या ५ व्या दिवशीच्या
कार्यक्रम अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक,मा. डॉ. नंदलाल पाटील व डॉ. विजयाताई पाटील ( संस्था सहसचिव) होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री. व सौ. प्रविण तायडे उपस्थित होते. तसेच श्री. व सौ. नंदू पाटील, श्री. व सौ. प्रशांत बेलपत्रे, श्री. व सौ. मिलिंद पाटील, श्री. व सौ. प्रविण पाटील आणि श्री. व सौ. प्रविण गावंडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आजच्या आरतीचा मान सौ. योगिता चौधरी मॅडम, श्री. व सौ. प्रफुल्ल पाटील, श्री. व सौ. योगेश सुशीर आणि श्री. व सौ. दीपक लेंदाळे या भाग्यवान पालकांना मिळाला.
गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी IIT, IISC, ISRO आणि NIT या संकल्पनांवर आधारित आकर्षक सादरीकरण केले. तसेच गणपती स्तोत्र, गणपतीची कथा आणि नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. विज्ञानासोबतच अध्यात्माची व संस्कारांची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देश्याने रोज प्रत्येक वर्गानुसार सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन शालेय प्रशासनाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेले आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात दरवर्षीप्रमाणे तुरटीच्या गणेशमूर्ती स्थापना व विद्यार्थ्यांनी शाळू मातीपासून साकारलेल्या श्री गणेशमूर्ती तसेच विद्यार्थ्यांच्या वर्गांना दिलेल्या आयटी क्षेत्रातील विविध संस्थांच्या नावाची व माहितीची पोस्टर्स प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले आहे. या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना बालवयापासूनच या सर्व गोष्टींचे माहिती मिळावी व त्यांना आपले ध्येय ठरविता यावे, हा या प्रदर्शनामागील व वर्गांना दिलेल्या नावामागील उद्देश्य असल्याचा डॉ.नंदलाल पाटील यांनी सांगितले. शाळेत गणपतीमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. शाळेच्या गणेशोत्सवासाठी नालंदा विद्यापीठाच्या थीमवर आधारित सजावट करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी व कला शिक्षकांनी मिळून आकर्षक सजावट साकारली आहे.
या सजावटीसाठी श्री. राहुल भारंबे, श्री. अनिल साळुंखे, श्री. हितेश गुरव, श्री. कुणाल थेटे आणि श्री. शुभम पाटील यांचे योगदान लाभले. शिक्षक वर्गासोबतच शाळेचे विद्यार्थी प्रेम रवींद्र मिस्त्री,
जयेश विशाल पाटील,
दुर्वा राहुल बारी,
तनिष्क प्रशांत पाटील,
प्रज्ञा ज्ञानेश्वर घुरके.
या विद्यार्थ्यांनीसुद्धा सदर देखावा उभारण्यासाठी विशेष सहकार्य केले.तसेच समन्वयक श्री. संदीप वाशिमकर सर यांचे सहकार्य लाभले.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शरयू चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. सुकन्या पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य डॉ. दीपक गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
